ब्लॉगिंग म्हणजे नेमकं काय ? | best way start Blogging in Marathi
नमस्कार मित्रांनो आता आपण बघणार आहोत ब्लॉगिंग म्हणजे काय?. बघा ब्लॉगिंग ही खूप जुनी संकल्पना आहे यामध्ये आपण लेख लिहित असतो , आपण लिखाणाच्या माध्यमातून लोकांना काहीतरी माहिती देण्याचा पण प्रयत्न करत असतो ते याच गोष्टीला ब्लॉगिंग म्हटलं जातं.
दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत चाललेले आहे आणि खूप जण व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॉगच्या माध्यमातून खूप सारे ऑनलाइन पैसे कमवत आहेत.
तुम्हीसुद्धा ब्लॉगिंगला फुल टाइम पार्ट टाइम करिअर म्हणून निवडू शकता.
ब्लॉगिंग करण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची गरज नाही ब्लॉगिंग हे लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत कोणीही करू शकतात म्हणजे त्यांना लिहिता येतं वाचता येतं ते प्रत्येक व्यक्ती ब्लॉगिंग करू शकते.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्लॉगिंग करण्यासाठी नेमक आपल्याला काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन लागेल.
बघा आता कोणतीही गोष्ट लिहायची म्हटली तर तुम्हाला त्या विषयाचं नॉलेज असलं पाहिजे.
मी तर म्हणेल की तुम्हाला त्या विषयाचं नॉलेज नसलं तरीही तुम्ही ब्लोगिंग करू शकता आता हे ऐकून तुम्हाला आनंद झाला असेल नेमका असं कसं काय करता येईल?
त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग न स्किप करता शेवटपर्यंत वाचायचे आहे या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला Blogging in marathi विषयाची माहिती देणार आहे.
बघा मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एखाद्या विषयाचं नॉलेज नसलं तरी तुम्ही ब्लॉग लिहू शकता.
कारण मित्रांनो इंटरनेटवर ही सगळी माहिती अवेलेबल आहे तुम्हाला एखाद्या विषयाचं थोडं जरी नॉलेज असेल तर त्या विषयांमध्ये तुम्ही सर्च करून वेगवेगळ्या विषयावर नॉलेज घेऊ शकतात या पर्टिक्युलर विषयांमध्ये नॉलेज देऊ शकता आणि त्यामध्ये तुमची जी काही पॉईंट आहे तुमची काय आहे ते लोकांना माहिती देऊ शकता.
आणि सध्याचा जो टाईम आहे तो मराठी भाषेमध्ये ब्लॉगिंग करण्याचा काळ आहे कारण गुगल सुद्धा मराठी भाषेला तेवढेच महत्त्व देत आहे मराठीमध्ये ब्लॉगिंग करणे अत्यंत सोपा आहे , कारण सहाजिकच आहे की मराठी भाषेमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट लिहायला खूप सोपे जाणार आहे किंवा त्या भाषेचे ज्ञान तुम्हाला असल्यामुळे कोणतीही माहिती त्यामध्ये घेण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी या दोन्ही गोष्टी तुम्हाला खूप सोपे जाणार आहे त्यामुळे मराठीमध्ये ब्लॉगिंग तुम्ही नक्कीच करू शकता.
चला मग आता या विषयांमध्ये आपण थोडसं point-to-point जाऊया.
ब्लॉग म्हणजे काय ?
एखाद्या विषयाबद्दलची माहिती सोपे आणि सविस्तर भाषेमध्ये लिहून लिखाणाच्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे त्याच माध्यमाला ब्लॉग म्हटलं जातं.
ब्लॉग चे प्रकार किती असतात ?
पर्सनल ब्लॉग आणि प्रोफेशनल ब्लॉग असे यामध्ये दोन प्रकार पाडले जातात
पर्सनल ब्लॉग म्हणजे काय?
पर्सनल ब्लॉगिंग मध्ये ब्लॉगर स्वतःच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवांना याठिकाणी लिखाणाच्या स्वरूपामध्ये शेअर करत असतो .
स्वतःच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी तो अनुभवातून शिकलेला आहे त्या गोष्टींना तो डिटेलमध्ये लिखाणाचा स्वरूपामध्ये मांडत असतो आणि त्यामधून लोकांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो
प्रोफेशनल ब्लॉग म्हणजे काय?
प्रोफेशनल ब्लॉग मध्ये ब्लॉगर एखाद्या पर्टीक्युलर विषयांमध्ये जात असतो आणि त्या विषयासंदर्भात जी काही माहिती आहे जे काही ऍडव्हान्स गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी एकत्रित करून ब्लॉग मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत असतो.
जर उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं तर तो हेल्थ, फायनान्स, करियर, अशा वेगवेगळ्या असंख्य कॅटेगरीमध्ये तो आपला ब्लॉग लिहू शकतो
प्रोफेशनल ब्लॉग मध्ये तुम्हाला ऑनलाइन अर्निंग सुद्धा करता येते
तुम्ही त्या पर्टीक्युलर विषयांमध्ये एक्सपर्ट असल्याकारणाने तुम्ही माहिती लिहू शकता त्याबद्दल तुमची जी वाचक आहेत ती त्या प्रकारची तुमचे कस्टमर सुद्धा बनू शकतात
तुमच्या कॅटेगिरी मध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट ना तुम्ही रिव्ह्यू करू शकतात याबद्दलची माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता त्यामधून तुम्हाला त्या प्रॉडक्ट विक्री केली जाऊ शकते आणि तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता
ब्लॉगर म्हणजे काय ?
जो कोणी इंटरनेटवर वेबसाईटच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचतोय म्हणजेच तो माहिती त्या ठिकाणी लिहीत आहे त्या लिहिणाऱ्या व्यक्तीलाच ब्लॉगर म्हटलं जातं
ब्लॉगिंग म्हणजे काय डेफिनेशन इन मराठी
इंटरनेटवर वेबसाईट तयार करणे आणि आपल्याला माहिती असलेल्या विषयांमध्ये त्यावर पोस्ट लिहिणे म्हणजेच ब्लॉगिंग करणे होय
ब्लॉगिंग करण्यासाठी विषय कसा निवडायचा ?
ब्लॉगिंग करण्यासाठी विषय निवडत असताना सर्वप्रथम तुम्हाला पाहिले पाहिजे की तुम्हाला कोणत्या विषयांमध्ये आहे किंवा तुम्हाला कोणते विषयांमध्ये आवड आहे हे आधी बघितलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही त्या विषयांमध्ये माहिती द्यायला सुरुवात करायची
मराठीमध्ये ब्लॉगिंग करण्यासाठी मी तुम्हाला काही विषय सांगणार आहे या विषयांमध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉगिंग ची वाटचाल चालू करू शकता
- मराठी क्रिकेट ब्लॉग
- फॅशन ब्लॉग
- मराठी फुड ब्लॉग
- शैक्षणिक माहिती ब्लॉग
- शेअर मार्केट टिप्स ब्लॉग
- दैनंदिन बातम्या देणारा ब्लॉग
- आरोग्य टिप्स व माहिती विषयक ब्लॉग
- marathi status blog
- ट्रॅव्हल ब्लॉग / कार माहिती ब्लॉग
- होम डेकोरेशन टिप्स व माहिती ब्लॉग
ब्लॉगिंग करण्यासाठी आता कोणते कोणते प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत हे आपण बघूया
- Wix (www.wix.com)
- WordPress (www.wordpress.org)
- LinkedIn (www.linkedin.com)
- Weebly (www.weebly.com)
- Medium (www.medium.com)
- Ghost (www.ghost.org)
- Blogger (www.blogger.com)
- Tumblr (www.tumblr.com)
तर ही सगळी संपूर्ण माहिती होती ब्लॉगिंग विषयी या वेबसाईटवर ब्लोग्लींग विषयी तुम्हाला सर्व काही माहिती स्टेप-बाय-स्टेप मिळेल येणाऱ्या आर्टिकल्स मध्ये ब्लॉगिंग मध्ये असलेल्या एका विषयांमध्ये मी आर्टिकल्स तुम्हाला लिहून या ठिकाणी पब्लिष करणार आहे माझे सुपरटेक मराठी या नावाने यूट्यूब चैनल पण आहे त्या युट्युब चॅनेल ची तुम्हाला लिंक आपल्या वेबसाईट मध्ये मिळेल मी या ठिकाणी ती टाकत आहे,
WATCH COMPLETE BLOGGING COURSE IN MARATHI
या यूट्यूब चैनल वर तुम्हाला व्हिडीओ फॉर्मेटमध्ये संपूर्ण Blogging in marathi कोर्स मी तुम्हाला शिकवत आहे
तरी या संधीचा नक्की फायदा घ्या आणि मराठीमध्ये ब्लॉगिंग करायला सुरुवात करा तर चला मित्रांनो भेटूया नवीन आर्टिकल मध्ये तोपर्यंत वाचत राहा आणि नेहमी आपल्या सुपरटेक मराठी या वेबसाईटला भेट देत राहा आणि या वेबसाईटला आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा त्यांनाही इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमवन्यासाठी मदत करा.
Nice information