How to Start a Blog
आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ब्लॉगिंग ची सुरुवात कशी करायची (How to Start a Blog).ब्लॉगिंग सुरुवात करायची म्हणजे तुम्हाला तुमचे विचार आणि कल्पना लोकांबरोबर शेअर करायचे आहे. ब्लॉगींग हा एक पैसे कमावण्याचा उत्तम मार्ग देखील आहे. जर तुम्ही ब्लोगिंग करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी मी तुम्हाला समोर स्टेप-बाय-स्टेप सांगणार आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि फॉलो करा.
How do I find and validate my niche as a blogger?
तुम्हाला एखादा विषय निवडायचा आहे ज्या विषयाचे तुम्हाला नॉलेज आहे. त्या विषयांमध्ये तुम्हाला लिहायला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर त्या विषयाची तुम्हाला आवड असली पाहिजे.म्हणजेच तुम्ही दीर्घकाळ त्यामध्ये ब्लॉग लिहू शकता. अशाप्रकारे आपण विषय निवडू शकतो
What is a popular blog platform?
(blog start) ब्लॉग सुरु करण्यासाठी आपल्याला आता एखादा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुद्धा शोधावा लागणार आहे.त्यामध्ये(wordpress) वर्डप्रेस आणि (blogger )ब्लॉगर अशी दोन विविध प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहण्यास मिळतील.यामध्ये ब्लॉगर हा गूगलचा प्रॉडक्ट असल्यामुळे तो फ्री मध्ये आहे.
यामध्ये फक्त तुम्हाला डोमेन खरेदी करण्याची गरज आहे.जर तुम्हाला वर्डप्रेसवर ब्लॉग करायची असेल तर त्यामध्ये मात्र तुम्हाला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे.
या दोन्ही प्लॅटफॉर्मचे फायदे आणि तोटे दोन्ही पण आहेत.त्यामुळे तुम्ही स्वतः संशोधन करून तुम्हाला आवडेल त्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही काम करायला सुरु करायचा आहे.
What is the difference between a domain and hosting?
आता पण डोमेन नेम आणि होस्टिंग काय आहे ते बघू या
डोमेन नेम म्हणजे इंटरनेटवरील तुमच्या ब्लॉगचा पत्ता आहे. म्हणजेच तुमच्या ब्लॉगचं नाव आहे.होस्टिंग म्हणजे ज्यामध्ये तुमच्या ब्लॉग मध्ये लिहिलेल्या पोस्ट आहेत ज्या संग्रहित केल्या जातात.
आपण वेगळ्या कंपनीकडून डोमेन आणि होस्टिंग खरेदी करू शकतो.
एकदा तुम्ही डोमेन आणि होस्टिंग घेतली की त्यानंतर तुम्हाला तुमची वेबसाईट डिझाईन करायची आहे.त्यामध्ये तुम्ही थीम निवडणे, लेआउट समावेश करणे, विजेट्स जोडणे ,हेडर मेनू व फूटर मेनू तयार करणे,कॅटेगरीज ॲड करणे, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्यामध्ये करायचे असतात.
वेबसाईट डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला ब्लॉग लिहायला सुरुवात करायची आहे. हा ब्लॉग सुरू करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.म्हणजे तुम्हाला आता त्यामध्ये पोस्ट लेखन करायचे आहेत.
तुम्ही जो काही विषय ठरलेला आहे यामध्ये तुम्हाला आता पोस्ट लिहायचे आहेत.तुम्ही तुमचा पोस्ट लिहिल्यानंतर त्याला पब्लिश करायचं आणी तुम्हाला तुमच्या ब्लॉगची जाहिरात करायची आहे.
कारण आता तुम्ही तुमच्या ब्लॉग वर पोस्ट लिहित आहात आणि पब्लिश करत आहात. ब्लॉगची जाहिरात करण्याचे खूप मार्ग आहेत. तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू शकता, ईमेल मार्केटिंग करू शकता, गेस्ट पोस्टिंग करू शकता, अशा प्रकारे तुमच्या ब्लॉगचा प्रसार तुम्ही करू शकता.
How do bloggers earn money?
आता आपण बघूया की ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे
तुम्ही तुमच्या ब्लॉग वर जाहिराती द्वारे पैसे कमवू शकता. तुमच्या विषयांमधील प्रोडक्स ची मार्केटिंग करून सुद्धा पैसे कमवू शकता. उत्पादने किंवा सेवा यांची विक्री करून तुम्ही पैसे कमवू शकता.
यशस्वी ब्लॉक सुरू ठेवण्यासाठी काही अतिरिक्त टीपा मी देत आहे
आपल्या आपल्या ब्लॉग प्रेक्षक संबंधित उच्च गुणवत्तेची पोस्ट लिहत रहा.सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन चैनल वर तुमच्या ब्लॉगची शेअरिंग वाढवा.
तुमच्या वाचकांशी संवाद साधा त्यांची उत्तरे द्या.यशस्वी ब्लॉग तयार करण्यासाठी संयमाने सातत्य ठेवा.अशा प्रकारे तुम्ही ब्लॉग लिहू शकता आणि ब्लॉगची सुरुवात करू शकता
ब्लॉगींग विषयक बरसे पोस्ट मी लिहिलेले आहे ते पोस्ट सुद्धा तुम्ही वाचा तुमच्या ब्लॉगिंग करिअरला एका उच्च लेव्हलवर घेऊन जा.
धन्यवाद