मित्रांनो या ब्लोग मध्ये आपण बघणार आहोत की ऑनलाईन पैसे कसे कमवता येतात. इंटरनेट आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक वेगळी क्रांती घडून आलेली आहे. त्यामुळे इंटरनेटवरुन पैसे कमवणे हा देखील त्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्याचबरोबर यामुळे ऑनलाईन पैसे कमवण्याचे अनेक अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या लेखामध्ये आपण ऑनलाईन कसे पैसे कमवता येतात याचा शोध घेणार आहोत. त्याचे फायदे जोखीम आपण बघणार आहोत
ई-कॉमर्स क्षेत्रामुळे आपल्या खरेदीच्या पद्धतीमध्ये खूप बदल झालेला आहे. करण्यामध्ये आपण घरबसल्या कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो ॲमेझॉन, अलीबाबा, यासारख्या ऑनलाइन बाजारपेठ यांनी यामध्ये खूप प्रगती केली आहे. त्यामुळे हा व्यवसाय जगातल्या खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचलेल आहे, आणि याचं मुख्य कारण म्हणजे ऑनलाइन पेमेंट आहे . ऑनलाइन पेमेंट चे भरपूर ऑप्शन असल्यामुळे कोणीही कुठेही बसून काहीही खरेदी करू शकतो आणि घरी बसल्या तो ती वस्तू मिळू शकतो.
अशा प्रकारच्या ई-कॉमर्स या क्षेत्रामध्ये आपण जर उतरलात तर त्यामध्ये तुम्ही तुमचं स्टोअर ऑनलाइन करू शकता आणि कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ती वस्तू विकू शकता.
क्रिप्टो करेंसी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान
बिटकॉइन, इथे रियम, लाईट कॉइन, यासारख्या बऱ्याचशा क्रिप्टो करेंसी सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत. आणि हे पैशाचे पर्यायी स्वरूप म्हणून झालेले आहेत. लोक अशा करन्सी ला एक गुंतवणूक म्हणून पाहतात.
कारण जर तुम्ही यामध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला खूप मोठ्या फायद्याची यामध्ये संभावना आहे. परंतु यामध्ये लॉस्ट चे सुद्धा तेवढेच संभावना आहे. परंतु तरीही मोठमोठे गुंतवणूकदार उद्योजक यामध्ये नेहमी इन्वेस्टमेंट करत असतात. या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता परंतु त्याआधी तुम्हाला या गुंतवणुकीच्या बद्दल ची सर्व माहिती घ्यावी लागेल आणि काळजीपूर्वक आणि विचार करून यामध्ये गुंतवणूक करावी .
जाणकार लोकांशी विचार विनिमय करून तुम्ही यामध्ये गुंतवणूक केली तर चांगले होईल.
ऑनलाइन फ्रीलान्सिंग आणि गिग इकॉनोमी
मागच्या काही वर्षात गिग इकॉनोमी खूप वाढलेली आहे. या वाढलेल्या गिग इकॉनोमी मुळे ऑनलाईन पैसे कमवण्याच्या खूप संधी उपलब्ध झालेले आहेत.
Upwork, Fiverr आणि Freelancer यासारखे फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म लोकांना जगभरातील ग्राहकांना त्यांची कौशल्य ऑफर करून पैसे मिळवण्यासाठी मदत करतात .
त्यामुळे तुम्ही तुमचे सर्विसेस लोकांना देऊ शकता जसे की लेखन ग्राफिक डिझाईनिंग प्रोग्राम इन डिजिटल मार्केटिंग आणि बरेच काही फ्रीलान्सिंग तुम्ही कुठेही कधीही बसून करू शकता त्यामुळे तुम्ही स्वतः तुमचे मालक असता तुम्हाला आर्थिक स्वतंत्रता सुद्धा भेटते.
Affiliate मार्केटिंग
या प्रकारच्या मार्केटिंग मध्ये आपण कंपन्यांसाठी ची उत्पादने आहेत किंवा सेवांचा प्रचार करून त्यांच्या बदल्यात आपण काही कमिशन मिळू शकतो.
त्यांच्या अपिलेट प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन यांच्या द्वारा प्राप्त झालेल्या लिंक द्वारे जर आपण यशस्वी विक्री केली तर आपल्याला त्यामध्ये काही पर्सेंट कमिशन मिळते.
जर तुमचा ऑनलाइन प्रेझेन्स चांगला असेल तुमच्या सोशल मीडियावर तुमचे चांगले फॉलोवर्स असतील त्यांना या प्रॉडक्ट विषयी तुम्ही माहिती देऊ शकता आणि तुम्ही त्यांना तुमच्या अपिलेट लिंकद्वारे त्यांना ती वस्तू खरेदी करायला सांगतात आणि त्यामुळे तुम्हाला कमिशन मिळते आणि अशाप्रकारे तुम्ही पैसे कमवता.
शेअर मार्केट
शेअर मार्केटमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवून शेअर खरेदी करू शकता आणि शेअर ची प्राईज वाढल्यानंतर ती विकू शकता आणि पैसे कमवू शकता शेअर खरेदी आणि विक्री करण्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट काढावा लागतो. त्यानंत
र तुम्ही तुम्हाला हवा असलेला शेअर खरेदी करू शकता आणि योग्य वेळ पाहून तुम्ही त्याला विकू शकता तर हा सुद्धा एक घरबसल्या पैसे कमवण्याचा चांगला मार्ग आहे परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे किंवा पैसे लावण्याआधी तुम्हाला या विषयाचे ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे.
ऑनलाइन उद्योजकता
सध्या खूप जन ऑनलाइन उद्योजक बनत आहेत आणि याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे .यामागचा सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुम्ही कमी पैशांमध्ये व्यवसाय सुरू करू शकताShopify, WooCommerce आणि Etsy यासारखे प्लॅटफॉर्म तुम्हाला ऑनलाईन स्टोअर उघडण्याचे आणि जागतिक स्तरावर तुमची विक्री करण्यासाठी ची पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देतात यामध्ये ड्रॉप शिपिंग प्रिंट ऑन डिमांड अशा प्रकारच्या ई-कॉमर्स मॉडेल्सना खूप प्रसिद्धी मिळालेली आहे त्यामुळे उद्योजकांना उत्पादन विक्री तसेच ब्रँड बिल्डींग ऑनलाइन मार्केट प्लेस आणि सोशल मीडियाचा खूप फायदा घेता येतो.Post navigation